मुंबई : विधीमंडळ अधिवशनाच्या आज (४ ऑगस्ट) शेवटच्या दिवस असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांसंबंधीची माहिती सभागृहात दिली. गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमाक देशात तिसरा नसून १०वा असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचार आणि त्यांच्या अपहरणांसंबंधी आकडेवारी देखील विधान परिषदेत सांगितली.
फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, मुंबई इतर मोठ्या शहराच्या तुलनेत महिलांना सुरक्षित वाटते. महिला रात्री-अपरात्री येथे प्रवास करतात. सांगितलं गेलं की, महाराष्ट्र गुन्हांमध्ये तिसरा आहे. महिला आणि बालकांवरील अत्याचारात महाराष्ट्र १२ व्या क्रमांकावर आहे. असाम, दिल्ली, ओडिसा, हरियाणा, तेलंगणा, राजस्थान, अंदमान निकोबार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. तर बाल लैंगिक गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र १७ वा आहे.
यावेळी ते म्हणाले कि , गेल्या काही दिवसात राज्यात मुद्दाम औरंगजेबाच्या मिरवणुकी निघाल्या. मुद्दाम काही लोक त्याचे स्टेटस ठेवत आहेत. औरंगजेब हा परकीय आहे. भारतीय मुसलमानांचा तो हिरो होऊ शकत नाही. भारतीय मुसलमानांचे हिरो हे ए.पी.जे अब्दुल कलाम आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत. जो कोणी राज्यात औरंगजेबाचा पुरस्कार करेल त्याला आम्ही सोडणार नाही असेही फडणवीस म्हणले.
वारकऱ्यांवर लाठीमार नाहीच
आळंदीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला होता. यावर स्पष्टीकरण देतांना फडणवीस म्हणाले की, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला, ही वस्तुस्थिती नाही. वारकऱ्यांवर कोणतेही सरकार लाठीचार्ज करत नसते. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी मंदिराबाहेर जमा झाले. विद्यार्थ्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. पण, ६५ दिंड्यानंतर तुम्हाला प्रवेश देऊ, असं सांगितल गेलं. पोलीस, नागरिक, संस्थेचे चोपदार आणि पालकी प्रमुखांनी विद्यार्थ्यांना थांबण्यासाठी विनंती केली. मात्र, ते ऐकण्यास तयार नव्हते. विद्यार्थीं बॅरिगेट्स तोडून पोलिसांच्या अंगावर धावले. तरीही त्यांना थांबवण्यात आलं. पुन्हा बॅरिगेट्सपर्यंत माघारी आणलं,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.