MLA Kalidas Kolambkar : कालिदास कोळंबकरांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

#image_title

MLA Kalidas Kolambkar : महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ दिली.

राजभवनात हा शपथविधी पार पडला. ७ ते ९ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या विशेष अधिवेशनासाठी आमदार कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढचे तीन दिवस ते विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम बघणार असून यादरम्यान ते नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात पहिले दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार असून ९ डिसेंबर रोजी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, विधासभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आमदार कालिदास कोळंबकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले कालिदास कोळंबकर ?
मला हंगामी अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत सकाळी फोन आला. त्यानुसार मी आज शपथ घेतली आहे. पक्षाने तीन चार दिवसांसाठी ही जबाबदारी दिली आहे, असे ते म्हणाले. पुढे बोलताना, २८८ आमदारांमध्ये मी सर्वात वरिष्ठ आहे. मी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता पक्षाने मोठं पद देऊन माझा सन्मान राखावा, अशी माझी अपेक्षा आहे, असंही त्यांनी नमूद केलं.