कल्याणेहोळ : धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ येथे अबालृद्धांनी आकाश दर्शनाचा आनंद घेलता. राष्ट्रीय विज्ञानदिन निमित्त विज्ञानगाव नोबेल फाउंडेशन, ग्रामपंचायत कल्याणेहोळ आणि विकास सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने अवकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खगोल अभ्यासक अमोघ जोशी होते. लहान वयातच विद्यार्थ्यांचे आकाशाबद्दलचे कुतूहल वाढवा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
पुढे बोलताना जोशी म्हणाले की, “पृथ्वी एक छोटेसे जग आहे.संपूर्ण विश्व म्हणजे अफाट ज्ञानाचा भांडार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अवकाश क्षेत्राच्या अभ्यासाकडे वळले पाहिजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आकाश निरीक्षण क्षमता जास्त असते असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी टेलिस्कोपच्या माध्यमातून अबालवृद्धांना आकाशाची सफर घडवली. यामुळे गावकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले.
यावेळी खगोल अभ्यासक विजयसिंह पवार, सरपंच रमेश पाटील , पोलीस पाटील, भिका पाटील, नोबेल फाऊंडेशन चे संस्थापक जयदीप पाटील, शिक्षक समाधान पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक समाधान पाटील यांनी केले. देवयानी पाटील यांनी आभार मानले.