Kangana Ranaut: ठरलं तर! ‘या’ पक्षाकडून निवडणूक लढवायला कंगना तयार

Kangana  Ranaut Election Updates: अभिनेत्री कंगना रणौत सध्या चांगलीच चर्चेत आहे. कंगनाला आपण आजवर अनेक सिनेमांंमधून अभिनय करताना पाहिलंय. कंगना गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे.

याचं कारण म्हणजे.. कंगना २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उभी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व गोष्टींवर कंगनाच्या वडिलांनीच शिक्कामोर्तब केलाय.

या पक्षाकडून कंगना लढवणार निवडणूक
तर जागरणने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणूक लढवणार आहे. वडील अमरदीप रणौत यांनी याविषयी विधान केलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपने कंगनाला निवडणुकीचं तिकीट दिल्यास ती निवडणूक लढवण्यास तयार आहे.

भाजप कंगनाला हिमाचल, महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्याची शक्यता तिच्या वडिलांनी वर्तवली आहे. याशिवाय भाजपने कंगनाला हिमाचलमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यास मंडी लोकसभा मतदारसंघ हे तिचे कार्यक्षेत्र असेल.

 

कंगनाने घेतली जेपी नड्डांची भेट
कंगना ही मूळची हिमाचलची आहे. अशातच तिने रविवारी कुल्लू येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीनंतर कंगनाने निवडणूक लढविण्याच्या चर्चेने राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे.

 

काही महिन्यांत कंगनाची जेपी नड्डासोबत तिसरी भेट आहे. जेपी नड्डा यांनी कंगनाच्या मनाली येथील निवासस्थानी भाजपच्या इतर नेत्यांसोबत नाश्ताही केला होता.

अशातच कंगनाच्या वडिलांच्या विधानाने ती निवडणूक लढवण्याच्या चर्चेला पुष्टी मिळाल्याचे दिसते. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कंगना निवडणुक लढवताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको.