नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी भाजपने मंगळवारी रात्री उशिरा जाहिर केली. यामध्ये १८९ जणांचा समावेश असून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे त्यांच्या शिग्गाव या मतदारसंघातूनत निवडणूक लढविणार आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल जाहिर करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने २२४ पैकी १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये ५२ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे ओबीसी समुदायातील ३२ उमेदवार, अनुसूचित जातींमधील ३० आणि अनुसूचित जमातींमधील १६ उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीमध्ये ८ महिला उमेदवारांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे ८ वकील, ३ शिक्षणतज्ज्ञ, १ माजी आयएएस अधिकारी, १ माजी आयपीएस अधिकारी, ३ माजी सरकारी कर्मचारी आणि ८ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि कर्नाटक राज्य प्रभारी अरूण सिंह, निवडणूक प्रभारी व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, निवडणूक सहप्रभारी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयात ही यादी जाहिर केली.
कर्नाटकात भाजपचीच हवा – अरूण सिंह
कर्नाटकात काँग्रेस पक्षात दुफळी असून जेडीएसची स्थिती बुडत्या जहाजाप्रमाणे आहे. त्यामुळे राज्यात मोठा जनाधार असलेल्या भाजपचीच राज्यात हवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डबल इंजिन सरकारवर कर्नाटकचा विश्वास असल्याने राज्यात भाजप पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास अरूण सिंह यांनी व्यक्त केला आहे.