केजरीवालांची मोठी घोषणा, म्हणाले ‘कर्नाटकमध्ये सर्व जागा..’

नवी दिल्ली :  कर्नाटक विधानसभा निवडणुका १० मे ला होत असून १३ तारखेला निकाल लागणार आहे. या तारखा जाहीर झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्ली, पंजाबनंतर केजरीवाल आता कर्नाटक काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

काय घोषणा केली?

केजरीवाल यांनी सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच निवडणुकीच्या मैदानात आता चार मोठे पक्ष एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध जेडीएस विरुद्ध आम आदमी पार्टी अशी लढत पाहायला मिळणार आहे.

आप सध्या निवडणुकीच्या मोसमात आघाडीवर आहे. पक्षाने ८० जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केले नसून केवळ चर्चा सुरू आहे.

मात्र आम आदमी पक्षाने ८० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. दिल्ली मॉडेलच्या आधारे कर्नाटकातील लोकांची मने जिंकण्याचे काम करणार असल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे.