पुणे : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीतून संभाजी ब्रिगेडनं माघार घेतली असून आता आम आदमी पार्टीन देखील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रानुसार कळतं.
पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार, किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी केली.
तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभांची निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढण्याचा निर्धारही मेनन यांनी केला आहे. याआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आ. सचिन अहिर यांच्या शिष्टाईनंतर संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी अर्ज मागं घेण्यास होकार दर्शविला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.