Kash Patel to head FBI : भारतीय वंशज काश पटेल यांची अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ‘एफबीआय’च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काश पटेल यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
काश पटेल यांचा संबंध गुजरात राज्याशी आहे. त्यांचे आई-वडील युगांडमध्येच राहिले. 1970 च्या दशकात ते गुजरातमधून अमेरिकेत गेले होते. 1980 मध्ये काश पटेल यांचा जन्म न्यूयॉर्कमधील गार्डन सिटीमध्ये झाला. त्यांना कायद्याची पदवी घेतली.
काश पटेल यांनी कार्यवाहक संरक्षण सचिव ख्रिस्तोफर मिलर यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले. याआधी त्यांनी राष्ट्रपतींचे उप सहाय्यक आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत दहशतवादविरोधी वरिष्ठ संचालक म्हणूनही काम केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात काश पटेल यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. त्यांची इसिस, अल बगदादी, कासिम अल रिमी सारखा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात महत्वाची भूमिका होती. त्यानंतर काश पटेल हे ट्रम्प यांच्या नजरेत आले. काश पटेल यांनी अमेरिकन बंधकांना पुन्हा देशात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती.
आता त्यांची अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ‘एफबीआय’च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काश पटेल यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.