तरुण भारत लाईव्ह न्यूज जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचालित, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या पालक सभेचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२३- २४ मध्ये इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमातील बदल ,परीक्षा पद्धती व त्याच्यातील बदल, इयत्ता दहावीची पूर्वतयारी, विद्यार्थ्यांपुढील भविष्यातील आव्हाने या विषयांवर पालकांशी चर्चा करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक आणि शिक्षक यांनी एकत्र येऊन चर्चा करणे किती आवश्यक आहे हे सांगून पालकांच्या मनात असलेल्या अनेक शंकांचे निरसन करण्यात आले.
तसेच शाळेच्या समुपदेशिका चंचल रत्नपारखी यांनी पालकांशी संवाद साधून मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेमध्ये घडून आलेले बदल व त्याचे दिसणारे दुष्परिणाम, मुलांचा वाढलेला चिडचिडपणा, नैराश्य, आक्रमकपणा या सर्व समस्या लक्षात घेऊन पालकांनी आपल्या पाल्याची मनमोकळेपणाने संवाद साधणे किती आवश्यक आहे यावर चर्चा करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करावे . याविषयी मार्गदर्शन केले. या सभेसाठी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी चर्चेमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या सभेसाठी विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा , शोभाताई पाटील, डॉ. रत्नाकर गोरे यांनी पालकांशी संवाद साधला.
सभेमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका, संगीता तळेले,इ. नववीचे वर्गशिक्षक, आरती केंकरे, मिनू छाजेड, . मनोज भादुपोता हे उपस्थित होते.