---Advertisement---

काश्मिरी पंडित संजय शर्मा यांचा मारेकरी ४८ तासांत ठार

---Advertisement---

जम्मू काश्मीर : काश्मिरातील अवंतीपोरातून मोठी बातमी समोर आली आहे. अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलाचे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दहशतवाद्यामध्ये पंडित संजय शर्मा यांची हत्या करणाऱ्याचा देखील सामावेश असल्यची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे.

ADGP काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव पुलवामा येथील आकिब मुस्ताक भट असे आहे. त्याने सुरुवातीला हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी काम केले. सध्या तो टीआरएफ या दहशतवादी संघटनेसोबत काम करत होता. एडीजीपी यांनी सांगितले की, दिवंगत संजय शर्मा यांच्या हत्येत दहशतवादी आकिबचा हात होता.

दुसरीकडे, अवंतीपोरा चकमकीत दोन जवानही जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान एक जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर दुसऱ्या जवानावर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत, याची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.

रविवारी पुलवामा येथील बाजारपेठेत जाणारे काश्मिरी पंडित बँक गार्ड संजय शर्मा यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. मारेकरी पडगामपोरा येथे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. हल्ला झाल्यापासून पोलीस आणि सुरक्षा दलांचे पथक मारेकऱ्यांच्या शोधात सतत गुंतले होते. 48 तासांत सुरक्षा दलांनी मारेकरी दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment