Kasoda : बत्तीस वर्षांनी स्नेह मेळाव्यात भेटले माजी विद्यार्थी

Kasoda : साधना माध्यमिक विद्यालय कासोदा येथील १९९१/९२ विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी एकत्र आले. हा स्नेह भेटीचा कार्यक्रम श्री क्षेत्र पद्मालय येथे संपन्न झाला.

अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक जी .पी .पाटील हे होते. तर वाय .के. पाटील, आर.  व्हि.पाटील हे शिक्षक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

३२ वर्षांनी भेटले जुने सवंगडी

बाल वयात जमलेली माहिती व त्यानंतर उद्योग व्यवसाय नोकरी या निमित्ताने बरेच मित्र वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आज मात्र सर्व मित्रांना भेटून प्रत्येक जण भारावलेला होता. भूतकाळात घडलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देत होता. प्रत्येक जण आपल्या मनोगतात बालपणाच्या आठवणी सांगत होता. तब्बल ७० माजी विद्यार्थी एकत्र जमले. त्यात २१ विद्यार्थिनी होत्या.

इंग्लंडहून उपस्थिती

याबाबत एक विद्यार्थी महेश वसंतराव साळुंखे हे एका कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. खास मित्रांना भेटण्यासाठी त्यांनी सुट्टी काढून श्रीक्षेत्र पद्मालय येथे या कार्यक्रमात हजर झाले. सर्वांना भेटून त्यांना खूप आनंद झाला.
सामाजिक कार्यात सहभाग घेण्याचा मनोदय

सर्व मित्रांनी एक बहुउद्देशीय संस्था फाउंडेशन स्थापन करून निधी एकत्र करून गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ व शैक्षणिक आर्थिक मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला.
कार्यक्रमात सर्वांनी आपला परिचय करून दिला. त्यानिमित्ताने बालपणीच्या आठवणी जागवल्या. शेवटी निरोप घेताना प्रत्येक जण भावना वश झाला होता. साश्रू नयनांनी सर्वांनी एकमेकांना निरोप दिला. मुंबई ,पुणे नाशिक,गांधीनगर ,कोल्हापूर ,धुळे ,अमळनेर, जळगाव येथील माजी विद्यार्थी हजर होते.  सूत्रसंचालन पांडुरंग चौधरी यांनी केले तर आभार जगन मराठे यांनी मानले.