ईशान्य भारताचा कौल !

 

अग्रलेख 

North India BJP लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी उरला असताना ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालॅण्ड आणि मेघालय या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कौल भाजपाच्या बाजूने आला आहे. North India BJP त्रिपुरात भाजपाला स्वबळावर स्पष्ट तर नागालॅण्डमध्ये भाजपा आघाडीला बहुमत मिळाले आहे. मेघालयचा कौल हा स्पष्ट नसला तरी तेथे भाजपा हा किंगमेकर ठरणार आहे. North India BJP त्यामुळे ‘सात भगिनींचा प्रदेश’ म्हणून ओळखल्या जाणा-या ईशान्य भारतातील तीन राज्यात भाजपाचे वा भाजपा आघाडीचे सरकार येईल, हे स्पष्ट आहे. North India BJP भाजपाविरोधात विरोधी पक्ष जेवढी चिखलफेक करतील, तेवढे कमळ फुलणार आहे, ही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया मार्मिक म्हणावी लागेल. ईशान्य भारत हा दिल्लीपासून तसेच आमच्या दिलपासूनही दूर नसल्याचे पंतप्रधान मोदी यांनी विजयानंतर आपल्या प्रतिक्रियेत जे म्हटले, ते योग्यच! North India BJP २०१४ मध्ये मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ईशान्य भारताच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले. ईशान्य भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी एक विभागही निर्माण केला. North India BJP  आतापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केले नसतील, एवढे दौरे मोदी यांनी या भागाचे केले. एवढेच नाही तर दर महिन्यात मोदी मंत्रिमंडळातील मंत्री या भागाच्या दौ-यावर जात होते. त्याचे परिणाम दिसून येत आहेत.

ईशान्य भारताचा सर्वांगीण विकास होत आहे. North India BJP विशेष म्हणजे या भागातील लोक देशाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. आतापर्यंत काँग्रेसच्या काळात ईशान्य भारतातील राज्ये देशापासून तुटल्यासारखी वागत होती. आपले भारतीयत्व अभिमानाने मिरवत नव्हती. आता भारत हा आमचा देश आहे; आम्ही भारताचे नागरिक आहोत, अशी राष्ट्रवादी भावना त्यांच्यात निर्माण झाली. याचे श्रेय संघपरिवारासोबतच मोदी यांना द्यावे लागेल. North India BJP या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयाचे श्रेय हे निर्विवादपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावे लागेल. मोदी हे भाजपाच्या विजयाचा हुकमी एक्का असल्याचे या तीन राज्यांतील निवडणूक निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष मोदींवर जेवढी जास्त टीका करतील, तेवढे भाजपाचे मताधिक्य आणि जागा वाढत जातील. North India BJP विरोधी पक्षांनी मोदींच्या मरणाची कामना केली; त्यांच्यासाठी कबर खोदण्याच्या गोष्टी केल्या, पण जनतेने मात्र विरोधी पक्षांच्या ‘मोदी मरजा’ ला ‘मोदी मतजा’ असे म्हणत चोख प्रत्युत्तर दिले. North India BJP  मोदींसाठी कबर खोदणा-या विरोधी पक्षांचीच कबर मतदारांनी या निवडणुकीतून खोदली आहे.

North India BJP या तीन राज्यांतील निवडणुकीत एकीकडे भाजपाला विजय मिळाला असतानाच दुसरीकडे काँग्रेस पक्षाचा पार धुव्वा उडाला. त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅण्ड मिळून विधानसभेच्या १८० जागा असताना नागालॅण्डमध्ये तर काँग्रेसला आपले खातेही उघडता आलेले नाही. North India BJP मेघालयात ५ तर त्रिपुरात ३ अशा फक्त ८ जागा या दोन राज्यात काँग्रेसला जिंकता आल्या. नागालॅण्डमध्ये तर काँग्रेसपेक्षा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती चांगली आहे. या राज्यात राकाँने ५ जागा जिंकल्या. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रात एकही जागा जिंकता न येणा-या रामदास आठवले यांंच्या रिपब्लिकन पक्षाने विधानसभेच्या दोन जागा जिंकत इतिहास घडवला. North India BJP मात्र, काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. North India BJP काँग्रेससाठी ही स्थिती चुल्लुभर पानी में डुब मरण्यासारखी आहे. २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसने मेघालयात २१ जागा जिंकल्या होत्या; यावेळी काँग्रेस पाचवर आली, म्हणजे काँग्रेसची स्थिती पाचावर धारण बसल्यासारखी झाली. २०१८ मध्ये त्रिपुरात काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. यावेळी ३ जागा जिंकून काँग्रेसने खाते उघडले, हीच काय ती थोडीशी जमेची बाजू. North India BJP त्रिपुरात सलग दुस-यांदा भाजपाने बहुमत मिळविले. २०१८ च्या निवडणुकीपेक्षा भाजपाच्या जागा यंदा ३ ने कमी झाल्या, ३५ वरून भाजपा ३२ जागांवर आली.

North India BJP मात्र, भाजपाचा हा विजय लक्षणीय असा आहे. २०१८ मध्ये सुनील देवधर यांच्या अथक परिश्रमातून त्रिपुरात भाजपाच्या विजयाचा पाया रचला गेला होता. त्यावेळचा भाजपाचा विजय म्हणजे ओसाड माळरानात नंदनवन फुलवण्याचा प्रकार होता. विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात भाजपाने नेतृत्वबदल केला होता. North India BJP बिप्लबकुमार देव यांच्या जागेवर मुख्यमंत्री म्हणून भाजपाने डॉ. माणिक साहा यांना आणले. भाजपाचा हा निर्णय अचूक असल्याचे निवडणूक निकालातून दिसून आले. ‘एक त्रिपुरा, श्रेष्ठ त्रिपुरा’ या ध्येयवाक्यानुसार माणिक साहा यांनी आतापर्यंतची आपली वाटचाल ठेवली. North India BJP दुस-यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांना याच दिशेने मार्गक्रमण करावे लागणार आहे. त्यांच्या विजयात या ध्येयवाक्याची मोठी भूमिका आहे, हे मान्य करावे लागेल. North India BJP  त्रिपुरात यावेळी भाजपाला हरवण्यासाठी काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्र आले होते. मात्र साप आणि मुंगुसाची ही आघाडी राज्यातील जनतेने नाकारली. साप आणि मुंगुसाच्या आघाडीचा हा प्रयोग याआधी महाराष्ट्रातही करण्यात आला होता. राज्यातील जनतेने हाही प्रयोग उधळून लावला. North India BJP केरळात एकदुस-याच्या विरोधात लढणारे काँग्रेस आणि डावे पक्ष त्रिपुरात एकत्र आले, पण जनतेला ते मान्य झाले नाही. याआधी असाच प्रयोग या दोन्ही पक्षांनी पश्चिम बंगालमध्येही केला होता; तेथेही तो यशस्वी झाला नाही.

North India BJP या तीन राज्यांतील मावळते मुख्यमंत्रीच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे दिसते. त्रिपुरात डॉ. माणिक साहा दुसèयांदा मुख्यमंत्री होऊ शकतात. मेघालयात नॅशनल पीपल्स पार्टीचे कोनराड संगमा भाजपाच्या पाठींब्याने मुख्यमंत्री होतील, तर नागालॅण्डमध्ये नेफ्यू रियो पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत इतिहास घडवतील आणि तीनदा मुख्यमंत्री झालेल्या काँग्रेसच्या एस. सी. जमीर यांचा विक्रम तोडतील, असे दिसत आहे. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राज्यात टिपरा मोथा या प्रादेशिक पक्षाचा झालेला उदय. North India BJP कधीकाळी काँग्रेसमध्ये असलेले आगरतळा येथील राजघराण्यातील प्रद्योत किशोर माणिक्य देबवर्मा यांच्या टिपरा मोथा या पक्षाने जिंकलेल्या १३ जागा! त्यामुळे हा पक्ष राज्यात दुस-या स्थानावर आला आहे. तो प्रमुख विरोधी पक्षही होऊ शकतो. टिपरा मोथा ग्रेटर टिपरालॅण्डची म्हणजे वेगळ्या आदिवासी राज्याची मागणी करणारा पक्ष आहे. North India BJP टिपरा मोथाला मिळालेल्या जनसमर्थनामुळे त्रिपुरात आता या राज्याच्या मागणीला गती येणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपाला या दृष्टीनेही विचार करावा लागणार आहे. राज्यात स्पष्ट बहुमत असले, तरी भविष्यातील राजकीय समीकरणांसाठी भाजपा राज्यात सरकार स्थापन करताना टिपरा मोथाला आपल्या सोबत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. North India BJP ईशान्य भारताच्या या तीन राज्यांत विधानसभेच्या १८०, तर लोकसभेच्या फक्त ५ जागा आहेत. त्यामुळे या तीन राज्यांतील निवडणूक निकालाचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर कसा आणि किती परिणाम होईल, असा प्रश्न कोणी विचारू शकतो. North India BJP संख्याबळाच्या दृष्टीने हे खरे असले, तरी या तीन राज्यांतील निवडणूक निकालाने भाजपाचा आत्मविश्वास दुणावणार आहे, तर काँग्रेसचा तेवढ्याच वेगाने कमी होणार आहे.

ज्याप्रमाणे कोणतीही लढाई फक्त सैनिकांच्या संख्येवर जिंकता येत नाही, तर त्या सैनिकात लढण्याची जिद्द किती आहे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास कसा आणि किती आहे यावर ठरत असते, तोच नियम निवडणुकीलाही लागू होत असतो. North India BJP या पराभवाने काँग्रेस आधीच आपला कमी होत असलेला आत्मविश्वास पूर्णपणे गमावणार आहे. तसेही निवडणूक लढण्याची जेवढी जिद्द भाजपा दाखवते आणि ज्या पद्धतीने निवडणुकीची तयारी करते, त्याच्या दहा टक्केही जिद्द काँग्रेस दाखवत नाही तसेच निवडणुकीची तयारीही करत नाही. North India BJP भाजपा आपली प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठी लढत असते, तर काँग्रेस पक्ष प्रत्येक निवडणूक लढायची म्हणून लढत असतो. २०२३ हे वर्ष तसे विधानसभा निवडणुकीचे आहे. या वर्षीच्या अखेरीस कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. North India BJP त्यानंतर २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे हे वर्ष राजकीयदृष्ट्या धावपळीचे ठरणार आहे. या तीन राज्यांतील अपयशामुळे काँग्रेसला आता आपल्या एकूणच धोरणाचा फेरविचार करावा लागणार आहे. North India BJP राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला तसे ब-यापैकी जनसमर्थन मिळाले होते; मात्र निवडणूक निकालातून त्याचे यत्किंचितही प्रतिबिंब उमटले नाही. यामुळे काँग्रेसला आपले काय चुकले, कुठे चुकले याबाबत आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. North India BJP  या विजयाने भाजपाचा आत्मविश्वास वाढणार आहे, ही चांगली गोष्ट असली, तरी आत्मविश्वासाचे रूपांतर अतिआत्मविश्वासात होणार नाही, याची काळजीही भाजपाने घेतली पाहिजे.