---Advertisement---
जळगाव : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांची आनंदाची बातमी आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे प्रथमच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पदवी अभ्यासक्रम सुरु होत आहे. अर्थात बी.ए. सिव्हिल सर्व्हिसेस (B.A. Civil Services) अभ्यासक्रम सुरु होत असून, यातून अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करता येणार आहे.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये व उपयुक्तता
UPSC/MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांच्या संपूर्ण तयारीसाठी विशेषतः डिझाइन
सामान्य अध्ययन, भारतीय राज्यघटना, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी यावर भर
तज्ज्ञ प्राध्यापक, अनुभवी मार्गदर्शक व अतिथी व्याख्यानांचा समावेश
कोर्स पूर्ण करून विद्यार्थी राज्य व केंद्र शासनाच्या सेवांमध्ये यशस्वी होऊ शकतात
पात्रता
कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थी/विद्यार्थिनी पात्र
अभ्यासात गती, जिज्ञासा आणि अधिकारी होण्याची प्रबळ इच्छाशक्ती असलेले उमेदवार प्राधान्याने निवडले जातील
विद्यापीठाच्या सुविधा
सुसज्ज ग्रंथालय
डिजिटल क्लासरूम्स
स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खास अभ्यासिका
विद्यार्थी वसतिगृह आणि कॅफेटेरिया
खेळाचे मैदान आणि मानसिक आरोग्य सल्लागार
सुरक्षित व प्रेरणादायी परिसर
अधिक फायदे
मार्गदर्शन कार्यशाळा
मॉक टेस्ट व मुलाखतीसाठी विशेष प्रशिक्षण
यशस्वी अधिकाऱ्यांशी थेट संवाद
कमी खर्चात उच्च दर्जाचा अभ्यासक्रम
प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, जागा मर्यादित आहेत. इच्छूकांनी तात्काळ प्रवेशासाठी अर्ज करा (https://forms.gle/pKuDf42gFDRKHJSL8), तथा अधिक माहितीसाठी 7972615656 संपर्क करा, असे आवाहन करण्यात आले आहे.