शेअर बाजारात ट्रेडिंग करताना ‘या’ 10 शेअर्सवर ठेवा लक्ष; इंट्राडेमध्ये मिळेल जबरदस्त नफा

सलग सात दिवसांच्या वाढीला गुरुवारी ब्रेक लागला. कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, आयटी आणि मेटल शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे निफ्टी 20,900 च्या जवळ बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 132.04 अंकांनी अर्थात 0.19 टक्क्यांनी घसरून 69,521.69 वर आणि निफ्टी 36.50 अंकांनी म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घसरून 20,901.20 वर आला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

ट्रेडिंग सत्रादरम्यान निफ्टी 20850-20950 च्या बँडमध्ये फिरत राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. आरबीआयच्या धोरण बैठकीपूर्वी बाजारात गुंतवणूकदार सावध आहेत. जोपर्यंत निफ्टी 21000 च्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली राहील, तोपर्यंत शॉर्ट टर्म ट्रेंड कमजोर राहील. 21000 वरील निर्णायक ब्रेकआउट बाजारात नवीन तेजी आणू शकेल. तोपर्यंत कमजोरी कायम राहण्याची अपेक्षा आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)
  • हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
  • ओएनजीसी (ONGC)
  • टाटा स्टील (TATASTEEL)
  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
  • पर्सिस्टंट (PERSISTENT)
  • पीएफसी (PFC)
  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
  • फेडरल बँक (FEDERALBNK)

 क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.