ब्रेकिंग न्यूज : भूस्खलनामुळे हाहाकार, शेकडो अडकले, सैन्याला पाचारण

वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसात भूस्खलन झाले आहे. यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदतीसाठी सैन्याला बोलवाव लागलय. फायर फोर्स आणि एनडीआरएफच्या टीम्सना प्रभावित क्षेत्रात तैनात केल्याची माहिती आहे. केरळच्या वायनाड जिल्ह्यात मेप्पडीजवळ डोंगराळ भागात मोठी दुर्घटना घडली आहे.

फायर फोर्स आणि एनडीआरएफच्या टीम्सना प्रभावित क्षेत्रात तैनात केल्याची माहिती केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. एनडीआरएफची एक टीम वायनाड येथे पोहोचली आहे. सैन्याने सुद्धा येथे पाचारण केलं आहे. वेगात सेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. सैन्याच्या चार तुकड्या घटनास्थळी आहेत. राष्ट्रीय आरोग्य मिशनने एक कंट्रोल रुम सुरु केलाय. इमर्जन्सी मदतीसाठी 9656938689 आणि 8086010833 हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास मेप्पडीजवळील डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यामुळे मलप्पुरममधील निलांबूर परिसरातून वाहणाऱ्या चालियार नदीत पूर आला. त्यामुळे वायनाडमधील मेप्पडी पंचायत अंतर्गत मुंडक्काई आणि चुरलमाला गावात अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. या अपघातात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान मोदींकडून संवेदना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन म्हटलयं की, “वायनाडच्या काही भागात भूस्खलन झाल्याच ऐकून मी व्यथित आहे. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलय, त्यांच्यासोबत माझ्या सर्व संवेदना आहेत. जखमींसाठी मी प्रार्थना करतो. प्रभावित लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरु आहे. केरळचे मुख्यमंत्री श्री पिनाराई विजयन यांच्याशी मी बोललो. केंद्र सरकार सर्व सहकार्य करेल” भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या नातवेईकांना पीएम मोदी यांनी 2 लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येईल.