---Advertisement---

अधिक पावला : खडसेंच्या जावयाला अखेर जामीन

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज : महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयालाचे लाड करणाचा महिना असतो. यातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला असून गिरीश चौधरी यांना मनी लॉनड्रिंगच्या गुन्हयात ईडीने अटक केली होती. गेली दीड वर्ष ते जेल मध्ये होते. दरम्यान, चौधरी यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता, की या व्यवहारामध्ये सरकारचं कोणतंही नुकसान झालं नव्हतं. तसेच या जागेसाठी एमआयडीसीची एनओसी घेण्याचीही आवश्यकता नव्हती. या दोन्ही बाबी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या असून चौधरी यांना जामीन मंजूर केला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment