---Advertisement---
जळगाव : सप्टेंबर शहरासह जिल्हावासियांना रविवारी (७ सप्टेंबर) रात्री खग्रास चंद्रग्रहण ही अद्भुत खगोलीय घटना बघायला मिळणार आहे. ही खगोलीय घटना ५ तास २७ मिनिटे पाहण्याची जळगावकरांना अनुभूती मिळणार आहे. शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्री ८ वाजून ५८ मिनिटांनी ग्रहण सुरुवात होऊन ९ वाजून ५७मिनिटांनी स्पर्श होईल, तर रात्री ११ वाजून ४२ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीच्या मध्यभागी येईल. सोमवारी (८ सप्टेंबर) मध्यरात्री १२ वाजून २३ मिनिटांनी चंद्राचा गडद सावलीतून विरळ सावतीत प्रवेश होऊन १ वाजून २६ मिनिटांनी चंद्रग्रहण सुटण्यास सुरुवात होईल. तसेच २ वाजून २५ मिनिटांनी चंद्रग्रहण संपेल. रविवारी रात्रीचे खग्रास चंद्रगहणाचा कालावधी ५ तास २७ मिनिटे असेल, तसेच तास २३ मिनिटांच्या काळात चंद्र पृथ्वीच्या गडद छायेत असेत.
चंद्रग्रहण होण्याची स्थिती
चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा (आयनिक वृत्त) यांच्यात ५ अंशांचा कोन आहे. चंद्राची कक्षा आयनिक वृत्ताता दोन ठिकाणी छेदते. त्यांना ‘राहू’ आणि ‘केतू’ असे म्हणतात. ज्या दिवशी पृथ्वी आणि सूर्य यांना जोडणान्या रेषेवर राहू किवा केतू हे बिंदू असताना तेथे चंद्र आता तर तो पृथ्वीच्या दाट सावलीत असल्याने खग्रास चंद्रग्रहण होते. अवकाशात पृथ्वीच्या गडद आणि विरळ अशा दोन सावल्या पडतात. चंद्राची कक्षा आणि आपनिक वृत्त यातील कोनामुळे प्रत्येक पौर्णिमेला चंद्र या बिदंवर असेलच असे नाही. कारण, हे दोन्ही बिंदू नियमित फिरत असल्याचे पाहावयास मिळते. ज्या वेळी तो या बिंदूंच्या जवळ वर किंवा खाली असतील. तर त्या वेळी चंद्र पृथ्वीच्या विरळ सावलीतून जातो. या खगोलीय घटनेला ‘छायाकल्प चंद्रग्रहण’ असे म्हटले जाते. ज्या वेळी तो या बिंदूंच्या किंचित वर किंवा खाली असतो, त्या वेळी चंद्राचा काही भागच दाट सावलीतून जातो. या वेळी खगोलीय घटनेता ग्रहणाला ‘खंडग्रास चंद्रग्रहण’ असे म्हटले जाते.
१ तास २३ मिनिटे चंद्र पृथ्वीच्या गडद छायेत राहणार
जळगावचे खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी सांगितले की, सध्या पाऊस किंवा ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. वातावरण स्वच्छ असेल तर सर्वांनी कोणतेही समज-गैरसमज मनात न ठेवता चंद्रग्रहण या अद्भूत खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा.