Khandesh in Ayodhya : 22 तारखेला जगातील सर्वात मोठा उत्सव साजरा होतं आहे. अयोध्या नगरीत रामलल्ला च्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा होतं आहे. सर्वं जग त्या क्षणाची आतुरतेनी वाट पहात आहे.
खान्देशमध्ये रामायण आणि महाभारतातील अनेक स्थळ आहेत. तिथे अनेक घटना घडल्याचे पुरावे आहेत.
ज्यांनी रामायण लिहिले ते वाल्मिक ऋषीं हे चाळीसगाव येथील वालझरी गावातील टोकरे कोळी होते .
रामायणातील सुरवातीची घटना म्हणजे दशरथ राजाच्या हाताने अनावधानाने घडलेली श्रावण बाळाची हत्या. हे ज्या तलावाकाठी आहे तो तलाव मुक्ताईनगर तालुक्यात आहे. हरताळे नावं असलेले गाव आणि तलाव आहेत. हर म्हणजे शिव आणि ताळे म्हणजे तलाव. या तलावाकाठी राजा दशरथाचा बाण लागून श्रावण गतप्राण झाला. त्याचं परिसरात, श्रावण बाळाचे जगातील एकमेव मंदिर आहे.
श्रावण बाळाच्या नावावरुन तिथे एक गाव वसले त्याचे नावं श्रवणगाव पुढे त्याचा अपभ्रश वरणगाव झाला.
तपोवन म्हणजे तापी ते नाशिक पर्यंतचा प्रदेश ती तपोभूमी. रामायनातील दंडकारण्य हे खान्देश मध्येच आहे. त्या काळात खान्देशचे नावं ऋषींदेश नावं होते. याच तपोवनात नाशिक येथे जनक राजानें यज्ञ केला होता. म्हणून या भागाला जनस्थान असेही आहे. या जनस्थान नावा वरुन तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या नावे जनस्थान पुरस्कार दिला जातो.
सीता स्वयंवर याच यज्ञ विधी वेळी इथे झाला असावा. नंतर विवाह समारंभ जनकपुरी इथे झाला असावा. वनवास काळात याच ठिकाणी पंचवटीत राम लक्षण सीता रहायला आले. इथेच लक्ष्मनाने शूर्पनखेंच नाक कापले. म्हणजे नाशिका कापली म्हणून या भागाला नाशिक असं नावं पडलं.
इथूनच रावणाने सीता चोरून नेली. याच ठिकानी सितेलां वाचविण्या साठी पहिलं रावण जटायू यांचे युद्ध झाले. याच भागात त्र्यंबकेश्वर येथे अंजनी पर्वतावर राम मारुती भेट झाली. कारण याच अंजनी पर्वतावर मारुती या खान्देशी राम भक्तांचा जन्म झाला. राम भक्त हनुमान याने सुग्रीव आणि प्रभुराम यांच्यात करार घडवून आणला.
गुजरात मधील डांग जिल्हा खान्देशचा आहे. त्याचं जिल्ह्यात शबरी धाम हे शबरीच निवांसंस्थान आहे. चोपडा तालुक्यात उनपदेव इथे राम बाणातून पाताळ गंगा हां गरम पाण्याचा झरा रामाने तयार केला. दरभंग ऋषीं या रामभक्ताला कुष्ठ रोग झाला होता.
त्यासाठी रामाने रामबाणातून पाताळ गंगा उत्पन्न करून दरभंग ऋषींचा कुष्ठरोग बरा केला. ही थोडक्यात राम आणि खान्देश यांचा संबंध दाखविणारी कथा आहे.
अयोध्येत खान्देश
1 अयोध्या नगरीच्या आंतराष्ट्रीय विमान तळाला वाल्मिक ऋषीचे नावं देण्यात आले आहे.
2 हनुमानाची मूर्ती तर प्रत्येक ठिकाणी रामा सोबत आहे.
3 जटायुचीही मूर्ती राम मंदिरात बसाविण्यात आली आहे.
4 मंदिरातील भोजन कक्षाला शबरीच नावं देण्यात आलं आहे.
5 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यां तळोद्याच्या मल्हाररावं होळकर यांच्या सून. ब्रिटिश सत्ता स्थापन होण्या आधी खान्देश होळकर राज्याचा भाग होता. त्या खान्देश राणीची अहिल्यादेवींचीही मूर्तीही राम मंदिरात बसविण्यात येणार आहे.
6 थाळनेरच्या लता मंगेशकर यांचं नावं एका मुख्य चौकाला देण्यात आले आहे.
7 सरदार पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. याच्या पेक्षा उंच रामाचा पुतळा आयोध्येत बसविण्याची योजना आहे. हां पुतळा गोंदूर धुळे येथील राम सुतार तयार करणार आहेत.
8 सोनगीर हे तांबे पितळीच्या भांडयासाठी प्रसिद्धी आहे. या तांबट कसाराणी 200 ताब्याचे नक्षीदार कळस तयार करून आयोध्येलां पाठविले आहेत. या कळसानें रामलल्ला वर प्राण प्रतिष्ठाच्या वेळी जलाभीषक होणार आहे.