जळगाव : ज्ञानाचा व शिक्ष्ाणाचा उपयोग हा देशासाठी व्हावा. शिवकाळातील शाहीरी साहित्यातून स्वातंत्र्याचे र्स्फुलिंग चेतविले. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याने जगण्याची दिशा दिली. शिक्ष्ाणाने केवळ व्यक्ती समृध्द होते असे नाही तर देशही समृध्द होत असतो. शिक्ष्ाणाचा सुगंध मातृभूमीत पसरावा. तरच जीवनाचे सार्थक होईल. असा संदेश पुण्याचे सुप्रसिध्द इतिहासतज्ज्ञ व शिवचरित्र व्याख्याते मोहन शेटे यांनी व्यक्त केले.
विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित 7 व्या खान्देस्तरीय कुमार साहित्य संमेलनातील सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, सचिव रत्नाकर गोरे, सहसचिव विनोद पाटील, सहकोषाध्याक्षा हेमाताई अमळकर, संमेलनाध्यक्ष दामोदर चौधरी, स्वागताध्यक्ष पियुष बालाजीवाले. कार्याध्यक्ष संस्कृती पवनीकर हे उपस्थित होते.
संमेलनाची सुरुवात ही शिवछत्रपतीचे चित्र कोडे सोडवून तर सरस्वती,ग्रंथांचे पूजन व दिपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. विवेकानंद प्रतिष्ठानच्या संगित शिक्षकांनी प्रतिष्ठान गीत सादर केले. कार्याध्यक्ष संस्कृती पवनीकर हिने विद्यार्थ्याची भूमिका स्पष्ट करत आभार मानले. तर रेणुका पाटील व पलक कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
साहित्य संमेलनात काव्यवाचन , कथाकथन , परिसंवाद , अभिवाचन व प्रकट मुलाखत या विविध साहित्य प्रकाराची मेजवानी कुमार साहित्यिकांनी प्रेक्षकांना दिली.
साहित्य संमेलन प्रमुख म्हणून भारती माळी, किर्ती नाईक, तारामती परदेशी, तेजस्वी बाविस्कर यांनी काम पाहिले.
संमेलनाचे नियोजन हे विवेकानंद प्रतिष्ठान सांस्कृतिक प्रमुख किरण सोहळे, प्रशासन अधिकारी दिनेश ठाकरे, डॉ. आचार्य अविनाश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांनी केले.
संमेलन परीपूर्ण व्हावे यासाठी संहिता लेखन तयारी प्रविण पाटील, श्रीराम लोखंडे, सचिन गायकवाड, मोहित जावे, उभारणी प्रमुख योगेश पाटील, कला शिक्षक रविंद्र भोईटे , दिपक सुपलकर, स्वप्निल पाटील ,देवानंद जोशी यांनी सहकार्य केलेे.
कोषाध्यक्ष्ाा हेमाताई अमळकर
विवेकानंद प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष्ाा हेमाताई अमळकर यांनी प्रतिष्ठानाची भूमिका मांडली. त्यात त्यांनी प्रतिष्ठान विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यासोबतच साहित्य संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका सादर केली. येथे केवळ विद्यार्थीच घडत नाही तर शिक्ष्ाकही घडत असतात. पाठपुस्तकासोबतच विद्यार्थ्यांमधील मुलभूत कलागुण आणि वेगळेपणा शोधून ते फुलवत असते. छंदातून विकासाची कल्पना प्रतिष्ठानचे सर्वप्रथम रूढ केली. स्वामी विवेकानंद यांच्या शिक्ष्ाणाबाबतचे विचार अंगीकारून ते विद्यार्थ्यांमध्ये रूजवत असल्याचे सांगितले.
पुस्तक भिशीतून भाषा समृध्दतेतीच चळवळ
सुरू व्हावी. संमेलनाध्यक्ष्ा दामोदर चौधरी
सर्व समाजाने मराठी भाषेतील शिक्ष्ाणाकडे पाठ फिरवली आहे. विद्यार्थ्यांना माय मराठीचा संस्कार रुजवून आणि काळाची पावले ओळखून मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये पारंगत करता येईल अशी शिक्ष्ाण व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. प्रतिष्ठानने बाल साहत्यिकांची चळवळ वृध्दीगत व्हावी म्हणून या साहित्य संमेलनाची यात भरच घातली आहे. अशी संमेलने वर्षातून दोन वेळा व्हावीत, जेणे करून अभ्यास्ााव्यतिरीक्त पुस्तकांचे वाचन करता येईल. वाचन संस्कृती जगली पाहिजे. वाचनाचे महत्व पटवून दिले पाहीजे. वृत्तपत्र वाचनाचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे. ‘माझी वही माझे लिखाण’ हा उपक्रम शिक्ष्ाकांनी राबवून घेतला पाहीजे. मुलांसाठी वाचन कटटा, साहित्यिंकाच्या मुलाखती असे विविध साहित्यिक कार्यकम घेत ते विद्यार्थ्यानी चालविले पाहिजे. त्यासाठी निधी गोळा केला पाहीजे. महिन्यातून एक दिवस सर्व शाळांतून विद्यार्थ्यानी एकत्र येत चर्चासत्र घ्यावीत. यातून विद्यार्थ्यांची साहित्य चळवळ उभी राहील. पुस्तकांची भिशी उपक्रम शाळांशाळांतून राबवावी. वाचन केले तरच भाषा समृध्द होईल. अशी अपेक्ष्ाा समेलनाध्यक्ष्ा दामोदर चौधरी याने यावेळी अध्यक्ष्ाीय मनोगतातून व्यक्त केली.स्वागताध्यक्ष्ा पियुष बालाजीवाले
संमेलनाचे स्वागताध्यक्ष्ा पियुष बालाजीवाले यांनी स्वागताध्यक्ष्ा म्हणून सर्वांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. केवळ शाळा नव्हे जीवन विषयक दृष्टीकोन देणारे गुरूकूल असलेल्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या शाळेत विद्यार्थीच नव्हे तर व्यक्तीही घडत असतात. बालसाहित्यिकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास, जडणघडण या शाळेत चांगली होते. शाळेतील संस्कार हे एका होकायंत्रासारखे आहेत. आपण कोणत्या दिशेने प्रवास करायचा हे शाळा आणि शाळेतील वातावरण ठरवत असते. आजचे साहित्य संमेलन आम्हा विद्यार्थ्यांना नव विचार करायला शिकवेल. अभिव्यक्ती शिकवेल, सादरीकरणाची दृष्टी देईल यात शंका नसल्याचे सांगीतले.