जळगाव : जळगाव जनता बँक व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून ‘खान्देश पापड महोत्सवाचे’ आयोजन होत आहे. या मह्त्सवाचे यंदाही १५ ते १७ एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजे पर्यंत लेवा बोर्डिंग,जी.एस.ग्राऊंड समोर,जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या हस्ते पापड महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) चे सहाय्यक महाव्यवस्थापक श्रीकांत झांबरे, बँकेचे संचालक सतीश मदाने, हरिश्चंद्र यादव, ललित चौधरी, सुशील हासवाणी, हिरालाल सोनवणे, डॉ. सुरेन्द्र सुरवाडे, संचालिका डॉ. आरती हुजुरबाजार, संध्या देशमुख,माजी संचालिका तसेच विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, माजी संचालिका सावित्री सोळुंखे, विंदा नाईक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय नागमोती, महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल, उपमहाव्यवस्थापक नितिन चौधरी आदी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवात 50 बचत गटांचा सहभाग असून येथे पापड, कुरडई, नागलीपापड, शेवया, हातशेवया उपवास पापड, मुखवास विविध प्रकार नैसर्गिक प्रकारची हळद, इ. सर्व वस्तु उपलब्ध असतील. महिला बचत गटांना प्रशिक्षण देणे व त्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच बचत गटांच्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने बँकेने राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या सहकार्याने सदर बाजारपेठेचे आयोजन केले आहे. पापड महोत्सवास नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.