नवी मुंबई : खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा 13 वर पोहचला आहे. या घटनेत अद्याप 10 रुग्ण वेगवेगळया रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, आता राज्य सरकारने मोठा निर्यण घेतला आहे.
कोणता निर्णय?
महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खारघर दुर्घटनेवर भाष्य केलं. 12 ते ५ वेळेत मोकळ्या जागेवर कार्यक्रम न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी सरकारने जीआर काढला आहे. अशी माहिती मंगलप्रभात लोढांची माहिती. जी दुर्घटना झाली ती दुर्दैवी होती. अशी पुन्हा परिस्थिती उद्भवु नये म्हणून राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 12 ते ५ वेळेत मोकळ्या जागेवर कार्यक्रम न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.