तरुण भारत लाईव्ह । २३ जानेवारी २०२३। आलू टिक्की या पदार्थाबद्दल तुम्ही ऐकलेच असेल हा पदार्थ टॅमोटो सॉस आणि हिरवी चटणी सोबत खातात. आलू टिक्की सारखाच खिमा टिक्की हा पदार्थ पण बनवला जातो आणि हा पदार्थ खायला अतिशय कुरकुरीत आणि खमंग लागतो. तुम्ही खिमा टिक्की हा पदार्थ घरी सुद्धा सोप्प्या पद्दतीने बनवू शकता. चला तर मग खिमा टिक्की घरी कशी बनवली जाते आणि त्यासाठी काय साहित्य लागते हे जाणून घ्या तरुण भारत च्या माध्यमातून.
साहित्य
कांदे, आलं लसूण पेस्ट, खिमा, लाल तिखट, गरम मसाला, कॉर्नफ्लॉवर, मीठ, बटाटे (उकडलेले), कोथिंबीर, तेल.
कृती
सर्वप्रथम उकडलेले बटाटे किसून घ्यावे. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालावा आणि मिश्रण मळून घ्यावं. त्यानंतर खिमा मध्ये मीठ घालून खिमा शिजवून घ्यावा कढईत तेल गरम करून कांदा परतून घेणे. कांदा लालसर झाल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट घालावी. नंतर खिमा घालावा. लाल तिखट, गरम मसाला व कोथिंबीर घालून कोरडे होईपर्यंत परतवावे. खिमा थंड करायला ठेवावे, त्यानंतर बटाटय़ाच्या लगद्याची छोटी वाटी तयार करून त्यामध्ये खिमा भरावा. घट्ट दाबून त्याला गोल व चपटय़ा अशा टिक्कीचा आकार द्यावा. फ्राइंग पॅनमध्ये मंद आचेवर फ्राय करावे. गरमागरम सव्र्ह करावे.