भडगाव : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला जळगाव जिल्ह्यात मोठी गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात भडगाव तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी काल मुबंईत शिवसेनेत प्रवेश केला. विशेषतः यामुळे आता आणखी शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष भय्यासाहेब पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अभिमन पाटील(वडजी), शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष नगरराज पाटील(पथराड), कजगावचे माजी उपसरपंच भानुदास महाजन, गेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराची प्रचाराची धरा सांभाळणारे प्रदिप देसले, वडजीचे माजी उपसरपंच कैलास पाटील, पिक सरंक्षण सोसायटीचे माजी अध्यक्ष मगन पाटील, कजगावचे हिलाल चौधरी कजगाव अशिष वाणी, गोपाळ माळी,पंढरीनाथ बोरसे, सावदे येथील धनंजय देसले, सागर पाटील, दिपक पगार, पिप्रिंहाटचे रावसाहेब पाटील, राष्ट्रवादि काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संतोष जाधव आदींनी आमदार कीशोर पाटील यांच्या यांच्या नेतृत्वात मुबंईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी आमदार किशोर पाटील,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील,युवासेनेचे जिल्हा उपसंघटक पुरुषोत्तम महाजन,वडजीचे उपसरपंच स्वदेश पाटील, भाऊसाहेब परदेशी, सुधाकर पाटील, जितेंद्र पाटील आदि उपस्थित होते.