Kia EV9 : भारतीय रस्त्यांवर सिंगल चार्जमध्ये 541 किलोमीटर धावणार ही कार

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये प्रत्येक कंपनी आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. यात टाटा मोटर्सने (TATA Motors) मोठी आघाडी घेतली असतांना आता त्यास टक्कर देण्यासाठी कियाने (Kia)आपली सर्वात मोठी इलेक्ट्रिक एसयूव्ही Kia EV9 सादर केली आहे. या 3-रो इलेक्ट्रिक एसयूव्हीला 99.8 kWh बॅटरी पॅक मिळतो आणि एका चार्जवर 500 किमी पेक्षा जास्त धावण्याचा कंपनीचा दावा आहे.

कारच्या स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये 76.1kWh बॅटरी आहे, जी रियर-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह येईल. दुसरे व्हर्जन 99.8 kWh च्या मोठ्या बॅटरीसह येते. तसेच, RWD आणि AWD या दोन्ही व्हर्जन उपलब्ध आहे. Kia EV9 सिंगल चार्जमध्ये 541 किलोमीटरपर्यंतची रेंज ऑफर करेल. फास्ट चार्जिंगद्वारे ही कार 15 मिनिटांत 200 किलोमीटरहून अधिक धावू शकते.

लाँग रेंज मॉडेलमध्ये इलेक्ट्रिक मोटर 201 hp पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. ही कार 9.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. तर स्टँडर्ड मॉडेल 8.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग प्राप्त करू शकते. सर्वात शक्तिशाली AWD व्हेरिएंटमध्ये ट्विन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत, जे 380 hp पॉवर आणि 600 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकतात.

असे असतील फीचर्स
Kia EV9 मध्ये 6 किंवा 7 सीट कॉन्फिगरेशनमध्ये आणले आहे. कारच्या डॅशबोर्डमध्ये तीन स्क्रीन आहेत. यामध्ये 12.3-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन, त्याच साइजचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि तिसरा 5.0-इंचाचा डिस्प्ले मिळतो. Kia 14-स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टम, एंबियंट लाइटिंग, मोठा सनरूफ आणि मसाज फंक्शन सीट मिळते. मधल्या लाइनमध्ये कॅप्टन सीट आहे, ची 180 अंशांपर्यंत फिरवली जाऊ शकते.

ADAS लेव्हल 3 टेक्नॉलॉजी EV9 इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये उपलब्ध असणार आहे. ड्रायव्हिंग सुलभ होण्यासाठी कारच्या आजूबाजूला 15 सेन्सर लावण्यात आले आहेत. सेन्सर्समध्ये लिडर लेझर सेन्सर, कॅमेरा, रडार आणि अल्ट्रासोनिक्सचा समावेश असेल. Kia EV9 मधील इतर फीचर्समध्ये ब्लाइंड-स्पॉट कोलिजन अवॉइडेंस असिस्ट, नेव्हिगेशन-बेस्ड स्मार्ट की, क्रूझ कंट्रोल आणि पार्किंग असिस्ट सिस्टम यांचा समावेश असणार आहे.