धुळे : शहरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अत्याचार करण्यात आला. तिचे अश्लील व्हिडीओ बनवून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना ११ जुलै २०२२ ते सप्टेंबर २०२३ या दरम्यान घडली, याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शनिवारी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळ्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले होते. तिच्यावर अत्याचार करत घरात डांबून ठेवण्यात आले होते- अश्लील व्हिडीओ बनवून मारहाण करण्यात आली, हा प्रकार धुळ्यासह सुरत येथे घडला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलगी धुळ्यातील आपल्या घरी निघून आली- तिने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात शनिवारी फिर्याद दाखल केली- त्यानुसार, ११ जणांविरोधात बाललैंगिक अत्याचार, बाल विवाहसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक व्ही. पी. पवार करीत आहेत.