---Advertisement---

Kingaon Accident : अज्ञात वाहनाची दुचाकीला जबर धडक, जखमी तरुणाचा मृत्यू

---Advertisement---

यावल : अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश धनगर (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील किनगाव गावातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्य मार्गावर मयुरी पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावरून गणेश धनगर (वय २२) हा तरुण दुचाकीने घरी जात असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत गणेश हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भास्कर तुळशीराम धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैदत झाली असून, सीसीटीव्ही फुटेज यावल पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यानुसार यावल पोलिसांनी पुढील तपासाची दिशा देखील ठरवल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांनी सांगितले. लवकरच सदर वाहन हे शोधून ताब्यात घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment