Shahada : शहादा पंचायत समितीतर्फे शहादा शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय पतंगोत्सव स्पर्धा व निवडणूक साक्षरता मोहीम कार्यक्रम लोणखेडा येथील क्रीडांगणावर सोमवारी झाला.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर झालेल्या स्पर्धेत तालुक्यातील प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील 110 स्पर्धकांनी सहभाग घेतला. पतंगोत्सव स्पर्धा व निवडणूक साक्षरता मोहीम कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील यांच्या हस्ते झाले प्रांताधिकारी सुभाष दळवी अध्यक्षस्थानी होते. यावेळी तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे,गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे, धडगावचे गटशिक्षणाधिकारी डी.डी. राजपूत,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.तावडे, केंद्रप्रमुख लोणखेडा श्री. रामोळे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या कल्पना पटेल, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, परिवर्धा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात बोलताना गटशिक्षणाधिकारी डॉ.योगेश सावळे म्हणाले, युवा हा देशाचा कणा आहे. निकोप लोकशाहीसाठी युवकांनी मतदार साक्षर होणे गरजेचे आहे. मतदार साक्षरता म्हणजे लोकशाही बाबत सजग राहून लोकशाहीने दिलेला अधिकार आणि निवडणुकीतील आपली भूमिका पार पाडणे होय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगतात उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी म्हणाले, पतंगोत्सव स्पर्धा व निवडणूक साक्षरता हा एकत्रित कार्यक्रम म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे.विद्यार्थी दशेत अभ्यासासोबत खेळाला महत्त्व द्यावे.
कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.पतंगोत्सव स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा . डॉ.अविनाश कांबळे व प्रा.जितेंद्र माळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मनोज चौधरी यांनी केले. आभार शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शहादा श्री.तावडे यांनी केले.
पतंगोत्सव स्पर्धेतील गटनिहाय विजेते स्पर्धक असे -:
*प्राथमिक गट-*
प्रथम रोहन मनोज काळे, द्वितीय हर्ष गण्या गोसावी, तृतीय पूर्वी मनोज काळे (सर्व जिल्हा परिषद केंद्र शाळा लोणखेडा)
*माध्यमिक गट-*
प्रथम अविनाश नथ्थू कुशवाह (किसान विद्यालय मोहिद तश), द्वितीय दानिश सतीश मुसळदे (माध्यमिक विद्यालय विद्याविहार), तृतीय विशाल हिरालाल भील (माध्यमिक विद्यालय शिरूड दिगर), उत्तेजनार्थ रविराज संपत पाडवी (माध्यमिक विद्यालय तीखोरा), सुमित जितेंद्र सोनवणे (श्री सातपुडा विद्यालय लोणखेडा).
*कनिष्ठ महाविद्यालय गट-*
प्रथम श्रीकांत दिनेश बोरसे (कनिष्ठ महाविद्यालय लोणखेडा), द्वितीय रोहित भालचंद्र निकुंबे (विकास ज्युनिअर कॉलेज शहादा), तृतीय सायली विजय कुशवाह (कनिष्ठ महाविद्यालय लोणखेडा) उत्तेजनार्थ प्रीती हेमराज कुंबरेले (कनिष्ठ महाविद्यालय लोणखेडा), रोहित मनोज जव्हेरी (मुन्सिपल न्यू इंग्लिश स्कूल शहादा)