तरुण भारत लाईव्ह । ५ मे २०२३। हिंदू धर्मात पूजेच्या ठिकाणी शंख ठेवण्याची परंपरा आहे. कारण शंख हे सनातन धर्माचे प्रतीक मानले जाते. पूजेच्या ठिकाणी शंख ठेवून तो फुंकल्याने शत्रूंचा नाश होतो आणि सौभाग्य वाढते असे मानले जाते. हिंदू धर्मात शंखाचे महत्त्व अनादी काळापासून चालत आले आहे. लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांनीही हातात शंख धारण केला आहे.
विष्णुपुराणानुसार माता लक्ष्मी ही समुद्र राजाची कन्या आहे आणि शंख हे त्यांचे भाऊ आहे त्यामुळे जिथे शंख असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो असाही समज आहे. या कारणांमुळे शंख पूजनाने भक्तांना सर्व सुख प्राप्त होणार आहे. घरामध्ये शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात आणि त्यासोबत धन आणि आरोग्य प्राप्त होते. तुमच्या घराच्या कोणत्याही भागात वास्तुदोष असेल तर त्या कोपऱ्यात शंख ठेवल्याने तेथील वास्तुदोष संपतो आणि घरात आनंद राहतो.
धर्मग्रंथात तीन प्रकारचे शंख सांगितले आहे दक्षिणावरती मध्यावरती आणि वाम. घरामध्ये सात्विक ऊर्जेचा संचार होतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर ती संपते. ज्या घरात वास्तूदोशामुळे नकारात्मकता असते त्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात शंख फुंकल्याने वास्तुदोषाचा वाईट प्रभाव नाहीसा होतो आणि त्याची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात.
शंखांचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार पूजास्थळी शंख स्थापित केला जातो. ज्या घरात शंख ठेवला जातो आणि तो रोज फुंकला जातो तिथे लक्ष्मी वास करते. त्याशिवाय वैवाहिक जीवनात संवाद वाढतो. जर तुमचे मुल अभ्यासात कमकुवत असेल तर शंखातील पाणी पाजल्यास बौद्धिक क्षमता विकसित होण्यास मदत होते.
म्हणजे शंखाचे केवळ धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व नाही तर वास्तुशास्त्रातही त्याचे महत्त्व मानले गेले आहे. यांचा वापर केल्यास अनेक फायदे मिळू शकतात त्यामुळे वास्तुदोष तर दूर होतातच शिवाय आरोग्य वाढ, आयुष्य प्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती, पुत्र प्राप्ती, पितृदोष शांती असे अनेक दोष दूर होतात.