तरुण भारत लाईव्ह । १७ एप्रिल २०२३। उष्माघात म्हणजे काय? उष्माघातानंतर काय होते? तुम्हाला किंवा कुटुंबातील सदस्यांना उष्माघात झाल्यास कसे ओळखावे? आणि यावर उपचार नेमके काय? असे अनेक प्रश्न चिंता निर्माण करतात. कारण उष्माघात ही हंगामी समस्या असू शकते. पण, त्यावर वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो.
उष्णतेशी संबंधित किरकोळ आजार उष्णतेमुळे पुरळ येणं, उष्णतेनं स्नायूंमध्ये पेटके येणं, चक्कर येणं, उष्णतेशी संबंधित प्रमुख आजार उष्णतेनं शरीरात डिहायड्रेशन होणं आणि उष्माघात होणं, 1 वर्षाखाली आणि १ ते ५ वर्ष वयोगटातील मुलं, गरोदर महिला, मधुमेह, हृदयविकार तसेच अल्कोहोलिक व्यक्ती, अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याच्या व्यक्ती
उष्माघाताची कारणं
उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामं भर उन्हात फार वेळ करणं, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणं, काच कारखान्यात काम करणं, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणं, घट्ट कपड्यांचा वापर करणं.
उष्माघाताची लक्षणे
त्वचेच्या छिद्रांवर लहान लाल पुरळ येऊन खाज सुटणं. पुरळ पाणीदार किंवा पांढऱ्या द्रवानं भरलं जाऊ शकतात. कधी कधी पूरळ न दिसता त्वचेला खाज सुटते. वारंवार वापरल्या जाणाच्या स्नायूंमध्ये वेदनादायक गोळे येणं. प्रभावित हात पाय/ सांधे आखडणं. पाय घोटा आणि हातांना सौम्य सूज येणं, उष्ण वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर काही दिवसांत दिसून येतं. अतिउष्णता, थकवा आणि कमकुवत वाटणं, उलट्या होणं, घाम येणं, तहान लागणं, दैनंदिन कामं करण्यास असमर्थता. घाम येणं, त्वचेचा लालसरपणा, अशक्तपणा. बेशुद्धपणा डोके हलके होऊन चेतना नष्ट होणे. शुद्ध हरपणे, श्वास फुलणे, हात-पाय बधीर होणं. तीव्र उष्णता, तीव्र अशक्तपणा, दिशाभूल, पूर्ण पणे सतर्क नसणं, विसंगत वर्तन, हृदयाचे ठोके वाढणं, रक्त दाब कमी होणे, कोमा
उपाय
बदलत्या तापमानात जास्त वेळ कष्टाची कामं करणं टाळावं. कष्टाची कामं सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करा. सरबत प्यावं. अधुनमधून उन्हामध्ये काम करणे टाळावे आणि सावलीत विश्रांती घ्यावी. उष्माघाताची लक्षणं सुरु होताच ताबडतोब उन्हात काम करणं थांबवावं आणि उपचार सुरु करावा. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरण यांचा वापर करावा.
उपचार
रुग्णास वातानुकुलीत खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत. आश्यकतेनुसार सलाईन देणं.