तुमच्याकडेही मोबाईल आहे का? तुम्ही ‘ही’ काळजी घेतात का…

तरुण भारत लाईव्ह । १९ मे २०२३। मोबाईल अति वापरामुळे स्फोट होऊन अनेकांचा जीव गेल्याचे आपण वाचले असलेच. मोबाईल स्फोट होण्यामागचे अनेक कारणे आहेत. मात्र, ती कारणं तुम्हाला माहितेय का? किव्हा मोबाईल हाताळताना आपण काय काळजी घ्यावी? हे तुम्हाला माहितेय का? नसेल माहिती तर आजच जाणून घ्या.

मोबाईलचा वापर करताना तुम्ही ओरिजनल चार्जरचाच वापर करा. कोणताही कमी दर्जाच्या चार्जरचा वापर करु नका. मोबाईलला सुर्प्रकाशात ठेवून कधीच चार्जिंग करु नका. यामुळे मोबाईल जास्त गरम होऊन त्याचा स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. बऱ्याचदा चार्जिंग पूर्ण होऊन देखील मोबाईल चार्जिंग करत ठेवला तर तो गरम होतो.

अनेकदा आपण मोबाईल चार्जिंग करताना कॉलवर बोलतो. पण हे असं करणं खूपच चूकीचे आहे. चार्जिंग करताना मोबाईलचे तापमान हे जास्त असते. त्यामुळे मोबाईल गरम होऊ शकतो. अशामध्ये मोबाईलवर अधिक दबाव येऊन त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते.

तसेच सध्या तर सगळ्यांना गेम खेळाची सवय असल्याचे दिसून येते. पण  मोबाईलवर गेम खेळताना तो जास्त तापतो. मोबाईलचे तापमान जास्त वाढत गेले तर त्याच्या बॅटरीचा स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे गेम खेळताना सावधान रहा. आणि लहान मुलांना गेम खेळायला देताना देखील विशेष काळजी घ्या.