---Advertisement---
व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असतो. आता मेटाने नवीन एआय फिचर आणले आहे. या फिचरच्या साहाय्याने तुम्हाला कोणत्याही मॅसेजबाबतची माहिती तात्काळ मिळू शकणार आहे. या फीचरचे नाव आहे आस्क मेटा एआय. हे फीचर कसे कार्य करेल आणि ते तुमचा चॅटिंग अनुभव कसा बदलू शकते याबाबत आपण जाणून घेऊया.
WABetaInfo च्या अहवालानुसार, हे फीचर सध्या अँड्रॉइड 2.25.23.24 साठी व्हॉट्सअॅप बीटामध्ये चाचणीत आहे आणि लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी सुरू केले जाण्याची शक्यता आहे.
काय आहे आस्क मेटा एआय फीचर ?
बनावट बातम्या आणि अफवांना रोखण्यास मदत करण्यासाठी व्हॉट्सअॅपद्वारा नवीन फिचर आणले आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला मॅसेज प्राप्त होईल तेव्हा आस्क मेटा एआय त्याच्या पर्यायात दिसणार आहे. त्यावर क्लिक करून, तुम्ही तो मॅसेज थेट मेटा एआय चॅटवर पाठवू शकता. तिथे तुम्ही त्या मॅसेजशी संबंधित प्रश्न विचारू शकता आणि तो फेक आहे किंवा नाही याची अधिक माहिती घेऊ शकता. तुम्हाला जेव्हा फॉरवर्ड केलेला मॅसेज आला. आणि तुम्हाला त्याची सत्यता जाणून घ्यायची असेल तर तो मॅसेज फॉरवर्ड करण्याऐवजी, तुम्ही थेट आस्क मेटा एआय वर क्लिक करू शकतात. यानंतर, तो संदेश मेटा एआय चॅटमध्ये हायलाइट केला जाईल आणि तुम्हाला त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारून योग्य माहिती मिळू शकेल. यानंतर, तुम्हाला दीर्घ प्रक्रिया करावी लागणार नाही. तुम्ही त्याच ठिकाणाहून थेट तपशील तपासू शकाल.
व्हॉट्सअॅपचे हे वैशिष्ट्य बनावट बातम्या आणि अफवांना रोखण्यास मदत करेल. तुम्ही कोणत्याही व्हायरल संदेशाचे सत्य आणि तथ्य सहजपणे तपासू शकाल. यामुळे चुकीची माहिती पसरण्याची शक्यता कमी होईल.
सध्या, हे वैशिष्ट्य फक्त बीटा आवृत्ती वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. कंपनी लवकरच ते जागतिक स्तरावरील सर्व वापरकर्त्यांसाठी सुरु कारणात आहे.