---Advertisement---
Gold-Silver Rate : ट्रम्प टॅरिफच्या अनिश्चिततेमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत वाढ होत आहेत. पण आज, देशात सोन्याच्या किमती मागील दिवसांच्या तुलनेत किंचित कमी झाल्या आहेत. सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ११० रुपयांनी स्वस्त झाले असून, ते १,०८,३८० रुपयांवर, २२ कॅरेट सोने १०० रुपयांनी स्वस्त होऊन ते ९९,३५० रुपये आणि १८ कॅरेट सोने ८० रुपयांनी स्वस्त होऊन ८१,२९० रुपयांवर पोहोचले आहे.
जळगावमध्ये आज २२ कॅरेट सोने प्रति तोळा ९८,९३० रुपये, तर २४ कॅरेट सोने प्रति तोळा १,०८,००० रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, चांदी प्रति किलो १,२४,५०० रुपयांवर पोहोचली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने १,०८,५३० रुपये प्रति १० ग्रॅमवर तर २२ कॅरेट सोने ९९,५०० रुपये आणि १८ कॅरेट सोने ८१,४१० रुपयांवर पोहोचले आहे. आर्थिक राजधानी मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ, पुणे, विजयवाडा, नागपूर आणि भुवनेश्वर मध्ये २४ कॅरेट सोने १,०८,३८० रुपयांवर पोहोचले आहे. तर २२ कॅरेट सोने ९९,३५० रुपये दराने आणि १८ कॅरेट सोने ८१,२९० रुपये दराने आहे.
चांदी दर
सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही थोडीशी घसरण दिसून आली आहे. आज म्हणजेच ८ सप्टेंबर २०२५ रोजी चांदी १,३६,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे, जी ८५० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
दिल्लीत चांदीची किंमत १,३६,५०० रुपये प्रति किलो आहे तर मुंबई आणि कोलकातामध्ये ती १,३६,२०० रुपये प्रति किलो आहे. चेन्नई आणि बंगळुरूमध्ये आज चांदीची किंमत १,३६,८०० रुपये प्रति किलो नोंदवण्यात आली आहे.