---Advertisement---
Jalgaon Gold rate : सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होत असताना दिसून येत आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत आज २४ कॅरेट सोने विनाजीएसटी ९९,५०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर जीएसटीसह सोन्याचा दर एक लाखाच्यावर आहे. दुसरीकडे चांदी दर १००० रुपयांनी वाढून प्रति किलो ११,४००० रुपयावर पोहोचली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने १,००,९१० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने ९२,४६० रुपये दराने आहे. अहमदाबाद आणि पटनामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,००,८१० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ९२,३६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
आर्थिक राजधानी मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे २४ कॅरेट सोने १,००,७६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने ९२,३१० रुपयांवर पोहोचले आहे.
दर कमी होणार की वाढणार ?
दरम्यान, आता आगामी दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात सोन्याचा दर कमी होणार की वाढणार ? याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.