तरुण भारत लाईव्ह । ४ सप्टेंबर २०२३। कृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमीअसेही म्हणतात,दरवर्षी भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो. महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्ण श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला खूप महत्व आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. दरवर्षीप्रमाणेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये संभ्रम आहे.
दरवर्षी जन्माष्टमी हा सण दोन दिवस साजरा केला जातो. एका दिवशी गृहस्थ जन्माष्टमी साजरी करतात आणि दुसऱ्या दिवशी वैष्णव पंथाचे अशा परिस्थितीत श्रीकृष्ण जन्मोस्तव ६ व ७ सप्टेंबर ला साजरी करतील आणि वैष्णव संप्रदाय ७ सप्टेंबरला जन्माष्टमी साजरी करतील. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात रात्री १२ वाजता झाला होता.