जाणून घ्या; मातृदिन साजरा करण्याची परंपरा का आणि कशी सुरू झाली

तरुण भारत लाईव्ह । १४ मे २०२३। मातृदिन हा उत्सव आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. तसेच हा कुटुंबातील किंवा व्यक्तीच्या आईचा तसेच मातृत्व, मातृबंध आणि समाजातील मातांचा प्रभाव यांचा सन्मान करणारा उत्सव आहे. हा जगातील बराच भागांमध्ये विविध दिवसांमध्ये साजरा केला जातो, सामान्यतः मार्च किंवा मे महिन्यांत हा साजरा केला जातो. काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे जागतिक महिला दिन हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात.

मातृदिन हा आईच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हा दर वर्षी संयुक्त राज्य आणि इतर काही देशांमध्ये मेच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. मदर्स डेचे संस्थापक अण्णा जार्विस यांनी माता आणि मातृत्वाच्या सन्मानार्थ मातृदिन साजरा करण्याची कल्पना सुचविली. इ.स. १९१४ मध्ये तिला राष्ट्रीय मान्यता मिळविण्यात यश आले. या दिवशी लोक त्यांच्या आईचा आदर करतात, तिला सप्रेम भेट म्हणून एखादी प्रिय वस्तू आणि शुभेच्छा देतात.

आधुनिक मातृदिन भारतीय संस्कृतीत आत्मसात करण्यात आला आहे आणि दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. भारतीय लोक हा प्रसंग धार्मिक कार्यक्रम म्हणून साजरा करत नाहीत.