जाणून घ्या; का साजरा केला जातो रेडिओ दिवस?

तरुण भारत लाईव्ह ।१३ फेब्रुवारी २०२३। 13 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रेडिओ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ‘युनेस्को’ने २०११ मध्ये जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली आणि इटलीत झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे २०१२ पासून जागतिक रेडिओ दिनाची सुरुवात झाली. जागतिक रेडिओ दिवस’ का साजरा केला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

पूर्वी अनेक लोकांची सुरवात रेडिओच्या आवाजाने व्हायची पण आता मोबाईल आल्यामुळे रेडिओ ऐकणाऱ्यांची संख्या कमी झाली. माहिती, संवाद आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जात होता. ‘युनेस्को’ने २०११ मध्ये जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली आणि इटलीत झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे २०१२ पासून जागतिक रेडिओ दिनाची सुरुवात झाली.

जगातला पहिला रोडिओ बनवला मार्कोनी या इटलीच्या शास्त्रज्ञानं. 1895 मध्ये त्यानं रेडिओचा शोध लावला आणि त्याचं पेटंटही मिळवलं. मार्कोनीला ‘फादर ऑफ रेडिओ’ असेही म्हणतात. याच माध्यमातून अमेरिका, आफ्रिका, आशिया खंड आणि ऑस्ट्रेलिया असा रेडिओचा प्रसार झाला. त्या काळी हे माध्यम प्रामुख्यानं कम्युनिकेशनसाठी वापरलं जात होतं. विशेषतः युद्धकाळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, अनेक खेळांच्या कॉमेंट्रीसाठी रेडिओचा वापर होऊ लागला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातही ब्रिटिशांनीच रेडिओ आणला.

रेडिओचे कमर्शियल आणि कम्म्युनिटी असे दोन प्रकार असतात. कम्म्युनिटी मध्ये स्थानिक संस्कृती, समान संधी आणि प्रवेश, स्वामित्व या गोष्टींना प्राधान्य दिले जातात तसेच कमर्शियल रेडिओ मध्ये मनोरंजन, सिनेमा, राजकारण, अशा गोष्टींना प्राधान्य दिले जाते. रेडिओ मध्ये तुम्ही करियर सुद्धा करू शकता, यासाठी तुमच्या कडे रेडिओ ला लागणारे कौशल्य पाहिजे जसे कि उत्कृष्ट संवाद कौशल्य, भाषेवर प्रभुत्व, हे कौशल्य तुमच्याकडे असायला हवे. तुम्ही बारावीनंतर मास कम्म्युनिकेशन हा ३ वर्षाचा कोर्स करून तुम्ही रेडिओ जॉकी साठी अर्ज करू शकता.

जर तुम्हाला कोणताही कोर्स करायचा नसेल तर तुम्ही कम्म्युनिटी आणि कमर्शियल रेडिओ चॅनेल मध्ये तीन महिने प्रशिक्षण घेऊ शकता नंतर रेडिओ चॅनेल मध्ये संधी उपलब्ध झाल्यावर तुम्ही अर्ज करू शकता. जर तुम्हाला बोलायची खूप आवड असेल तर तुम्ही हे करियर म्हणून निवडू शकता.