भारताची रन मशिन पुन्हा एकदा पाकिस्तानविरूद्ध धडाडली आहे. आशिया कपच्या सुपर 4 मधील पाकिस्तानविरूद्धच्या सामान्यात विराट कोहलीने केएल राहुलच्या साथीने दमदार फलंदाजी करत भारताला 46 व्या षटकात 300 च्या पार पोहचवले.
विशेषतः राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याच्या विरोधात असलेल्यांनाही त्याने शांत केले. यामध्ये एक नाव होते गौतम गंभीरचे, जो इशान किशनला संघात कायम ठेवण्याच्या बाजूने होता.
हे नशीबच होते, ज्यामुळे केएल राहुलच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. IPL 2023 दरम्यान, क्षेत्ररक्षण करताना मांडीला झालेल्या दुखापतीमुळे राहुलला हंगामाच्या मध्यभागी बाहेर फेकण्यात आले.
तेव्हापासून तो संघातून बाहेर पडत होता. यावेळी संघाने इतर खेळाडूंनाही आजमावले पण त्यातही त्यांना फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर तो तंदुरुस्त होताच, किरकोळ दुखापतीमुळे त्याचे संघात पुनरागमन होण्यास विलंब झाला.
राहुलविरुद्ध नशिबाचा तोच खेळ सुरू होता, जिथे त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला इशान किशनला मधल्या फळीत खेळवायचे होते आणि इशानने ८२ धावांची उत्कृष्ट खेळी खेळून आपला दावा पक्का केला.
हीच ती वेळ होती जेव्हा आयपीएलमध्ये केएल राहुलचा कर्णधार असलेला लखनऊ सुपर जायंट्सचा माजी भारतीय सलामीवीर आणि मार्गदर्शक गौतम गंभीरनेही आगामी सामन्यांमध्ये राहुलच्या जागी इशानला संधी मिळावी असे म्हटले होते. सलग चार अर्धशतके झळकावणाऱ्या इशानला काढून टाकणे योग्य नाही, राहुलला बाहेर ठेवले जाऊ शकते, असे गंभीर म्हणाला होता. आता आशिया कपच्या सुपर 4 मधील पाकिस्तानविरूद्धच्या सामान्यात दमदार फलंदाजी करत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याच्या विरोधात असलेल्यांना त्याने शांत केले आहे.