---Advertisement---

Crime News : प्रेयसीची वारंवार तीच मागणी; शेवटी प्रियकराने कंटाळून लॉजवर नेलं अन्…

---Advertisement---

कोल्हापूर : प्रेयसीकडून वारंवार होणाऱ्या मागणीला कंटाळून प्रियकराने लॉजवर नेऊन तिची हत्या केली. ही घटना कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये उघडकीस आली आहे. सुमन सुरेश सरगर (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून, आदम गौस पठाण (४५) असे त्याचे नाव आहे.

पोलीस सूत्रानुसार, आदम आणि सुमन यांच्यात सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, सुमन ही आदमकडे वारंवार पैशांची (सात लाख रुपये) मागणी करत होती. मात्र, त्याला ही रक्कम देणे शक्य नसल्याने तो या मागणीला कंटाळला होता. गुरुवारी (१२ जून) रोजी दुपारी आदम हा सुमनला अतिग्रे येथील एका लॉजवर घेऊन गेला. त्यानंतर त्याने सुमनच्या डोक्यात हातोडीने वार करून तिला ठार केले.

दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत दोघेही बाहेर न आल्याने लॉज मालकाला संशय आला. त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सुमन रक्ताच्या थारोळ्यात, तर आदम हा पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. लॉज मालकाने त्याला पकडून एका खोलीत कोंडून ठेवले, त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी होत आदमला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी प्रियकर आदमविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

पत्नीचाही केला खून


दरम्यान, आदम हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याने याआधी आपल्या पत्नीचा खून केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात त्याच्यावर खटला सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीआहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment