Kolkata Doctor Rape-Murder case : नवा ट्विस्ट… तपास अधिकारी काय म्हणाले ?

कोलकता : कोलकाताच्या के आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात आणखी नवा द्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण, या प्रकरणातील प्रमुख आरोपी संजय रॉय याने न पटणारा दावा केला आहे.

काय म्हणाला आरोपी संजय रॉय ?
सीबीआयने विविध पुरावे दाखवून संजयला अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी “मी सेमिनारच्या खोलीत चुकून गेलो. तेथे डॉक्टरचा मृतदेह आधीच खाली पडलेला होता. तिला हलवून पाहिले. मात्र, काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे मी घाबरून पळालो आणि कशाचा तरी धक्का लागून धडपडलो. त्यावेळी ब्लूटूथयंत्र खाली पडले”, असा दावा याप्रकरणातील प्रमुख आरोपी संजय रॉय याने केला आहे.

संजय रॉय याने सांगितले की, ८ ऑगस्टच्या रात्री एका रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्याला ऑक्सिजनची गरज होती. त्यासाठी डॉक्टरला शोधत होतो. त्यावेळी तिसऱ्या मजल्यावरील सेमिनारच्या खोलीत गेलो. तेथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह पडलेला होता. मी त्या डॉक्टरला आधीपासून ओळखत नव्हतो, असेही रॉय याने सांगितले.

दरम्यान, महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्येचा तपास सीबीआय करीत आहे. याप्रकरणी आतापर्यंत १० जणांची पॉलिग्राफ चाचणी झालेली आहे.

तपास अधिकारी काय म्हणाले ?
गेल्या आठवड्यात संजय सियालदह इथल्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोरही असाच दावा केला होता. माझं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मी पॉलीग्राफ चाचणीस संमती देतोय, असं संजयने म्हटलं होतं.

आरोपीची पॉलीग्राफ चाचणी करण्यापूर्वी त्याची आणि कोर्टाची परवानगी घेणं आवश्यक असतं. सीबीआय आणि पोलिसांना त्याच्या निर्दोषत्वाच्या दाव्यांमध्ये स्पष्ट विसंगती आढळूल आली.

“संजय हा तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमा आणि गुन्ह्याच्या वेळी सेमिनार हॉलमधील त्याची उपस्थिती यांविषयी तो कोणतेच स्पष्टीकरण देऊ शकला नाही,” असं एका अधिकाऱ्याने ‘माध्यमां’शी बोलताना सांगितलं.