---Advertisement---

कोरियन तरुणीच्या मदतीसाठी धावले दोन हिंदू तरुण, शेख, अन्सारीला अटक

---Advertisement---

मुंबईः पश्चिम उपनगरातील खार येथे लाईव्ह करणार्‍या एका कोरियन यूट्युबर तरुणीची दोन तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे मुंबईचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब होत असल्याची चर्चा देखील सुरु झाली होती. या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे. दोन तरुण कोरियन तरुणीची छेड काढत असताना अन्य एक मुलगा तिच्या मदतीसाठी धावून येतो. तसेच त्या छेड काढणार्‍या तरुणांना पळवून लावतो. एका तरुणाने या घटनेचा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचवून दोघा आरोपींना पकडून देण्यात मदत केली. या तरुणीने दोन्ही तरुणांचे खास पद्धतीने आभार मानले आहेत. अथर्व आणि आदित्य अशी या दोन्ही तरुणांची नावे आहेत. तर तरुणीची छेड काढल्या प्रकरणी मोबिन शेख (१९) आणि मोहम्मद नकिब अन्सारी (२१) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

कोरियाची नागरिक असलेली तरुणी काही दिवसांपूर्वी मुंबईत आली होती. ही तरुणी युट्युबवर चॅनेल चालवत असून तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. लाइव्ह व्लॉगच्या माध्यमातून ती मुंबईतील आपले अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर करत होती. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने तिच्यासोबत जबरदस्तीने बोलायला सुरुवात केली. तरुणी त्याला टाळायचा प्रयत्न करीत असतानाही ते टवाळखोर तरुण तिला त्रास देत होते. त्या तरुणीने कसाबसा तिथून काढता पाय घेतला. दुचाकीवरून हे दोघे पुन्हा त्या तरुणीच्या मागे आले आणि दुचाकीवर बसण्याची जबरदस्ती करू लागले. हे सर्व लाईव्ह असल्याने अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

त्याचवेळी तिथे अथर्व नावाचा तरुण आला आणि त्याने त्या दोघांना थांबण्यास सांगितले. त्यानंतर अथर्वने त्या तरुणीला सुरक्षितपणे तिच्या हॉटेलपर्यंत पोहोचवलं. तर, दुसरीकडे छेडछाडीचा हा प्रकार आदित्य नावाच्या तरुणाने पोलिसांपर्यंत पोहोचवला. पोलिसांनी लगेचच आदित्य आणि मुलीशी ट्विटरवर संपर्क साधला. तसंच, सू-मोटो कारवाईपर्यंत या दोघा तरुणांनी तिची मदत केली. कोरियन युट्यूबरने आदित्य आणि अथर्वचे खास पद्धतीने आभार मानले आहेत. तिने दोघांनाही तिने हॉटेलमध्ये जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. तिने तिघांचा फोटो ट्वीट करत त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment