मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत झालेला पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्या परवानगीनेच झाला असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरुन पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला. त्यासंदर्भात शरद पवार यांनी स्पष्टीकरणही दिलं. आता, यासंदर्भात पहाटेला शपथ देणारे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीच केलेल्या खटाटोपावर प्रत्युत्तर दिलंय.
कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरुन पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले की, ज्या पद्धतीने पहाटेचा शपथविधी झाला. जर अशारितीने शपथविधी झाला नसता, तर राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली नसती, असं शरद पवारांचं म्हणणं आहे, यासंदर्भात भगतसिंह कोश्यारींना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, माजी राज्यपालांनी शरद पवारांसारख्या बड्या नेत्यांनी जर-तर वर भाष्य करणे योग्य नसल्याचं म्हटलं. तसेच, मग शरद पवारांनी कोर्टात जे लवासाचं प्रकरण आहे. त्यावर दहा वेळा विचार करायला हवा.
कोर्टाने काय म्हटलं आहे त्याबद्दल. ते इतके मोठे व्यक्ती आहेत. त्यांचा मी सन्मान करतो. माझ्या हस्ते त्यांना दोन वेळा डी. लिट पदवी दिली गेली. मी त्यांचा आदर करतो. ते जर असं बोलत असतील, तर ते राजकीय बोलत आहेत, असे उत्तर भगतसिंह कोश्यारी यांनी दिले.