---Advertisement---

कुरंगी-बांबरुड जि.प. गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

---Advertisement---

सुरेश तांबे
पाचोरा :
पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. सदस्य पदमबापू पाटील यांचे उपस्थितीत कुरंगी – बांबरुड जि. प. गटातील नांद्रा येथील सुमारे शेकडो  कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला.

आमदार किशोर पाटील यांच्या विकास कामाचा वाढता आलेख पाहता व जनतेच्या मनातील लोकप्रियता बघता आपला नेता कसा असावा तर तो आमदार किशोर पाटील यांच्यासारखा असावा हाच ध्यास मनी बाळगून पाचोरा तालुक्यातील कुरंगी-बांबरुड जि. प. नांद्रा येथील माजी आजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, व कार्यकर्ते अमोल सूर्यवंशी, विनोद तावडे, योगेश सूर्यवंशी, सोपान पाटील, संदीप सूर्यवंशी, प्रवीण तावडे, अशोक कुंभार, शंकर कुंभार, सागर तावडे, भारत तावडे, शुभम सूर्यवंशी, समाधान सूर्यवंशी, पंकज बाविस्कर, पितांबर तावडे, रमेश पाटील, सोसायटी चेअरमन मनोज भाऊराव, यांसह सुमारे शेकडो कार्यकर्त्यांचा आमदारांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.सदस्य पदम बापू यांचे उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्षात पक्ष प्रवेश केला आहे.

आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थान च्या शिवालय कार्यालय येथे 30 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन पंकज बाविस्कर यांनी केले तर आभार आभार योगेश सूर्यवंशी यांनी मानले, यावेळी कुरंगी येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, विभाग प्रमुख दिनकर पाटील, डॉक्टर अलीम शेख, सुदाम पाटील, ज्ञानेश्वर पाटील व कुरंगी येथील सरपंचपती नगराज पाटील आधी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment