Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत देण्यात येते. डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर जानेवारीच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.
तटकरे म्हणाल्या की, “लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हफ्ता 26 जानेवारीपूर्वी महिलांच्या खात्यात जमा होईल. पुढील 3 ते 4 दिवसांत लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात होईल. ही योजना सुरूच राहणार असून, दर महिन्याला महिलांना हा लाभ मिळत राहील.”
महायुती सरकारच्या निवडणूक प्रचारावेळी महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. यावर तटकरे यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, “सध्याच्या महिन्यात 1500 रुपयेच जमा होतील. 2100 रुपयांचा विचार नवीन अर्थसंकल्पानंतर केला जाईल. यासाठी 3,690 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.” योजनेमुळे महिलांमध्ये मोठा आनंद असून, पुढील महिन्यांमध्ये होणाऱ्या बदलांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.