महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली होती, जी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे.
या योजनेअंतर्गत दोन कोटींहून अधिक अर्ज आले असून दीड कोटीहून अधिक बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये थेट त्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. या योजनेसाठी आतापर्यंत पाच हप्ते वितरित केले गेले आहेत.
मात्र, सोशल मिडीयावर या योजनेतील निकष बदलण्याची बातमी पसरली होती. याबाबत आता आमदार आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
काय म्हणाल्या आदिती तटकरे ?
लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. योजनेचे निकष बदलणार नाहीत आणि याबाबत कोणतेही लेखी आदेश किंवा शासन निर्णय घेतलेले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही योजना कायम राहणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, महिला व बाल विकास (WCD) विभागाने सर्व अर्जांची पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. योजनेच्या पारदर्शकतेसाठी पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.
अर्थात सादर केलेल्या कागदपत्रांची उलटतपासणी, लाभार्थ्यांच्या घरांना भेटी, डेटा मॅचिंग प्रक्रिया, ज्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे लाभ घेतला आहे, त्यांना योजनेंतून बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येईल.
मात्र, खोटी माहिती दिल्यास एफआयआर दाखल करण्याचा प्रस्ताव ठेवला, असल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर पसरत आहे. अशाच याबाबत कोणतेही लेखी आदेश किंवा शासन निर्णय घेतलेले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही योजना कायम राहणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता अफवांवर विश्वास ठेवण्याचे काही कारण नाही.