Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला असून, आता जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या 26 जानेवारीपूर्वी जमा होणार आहे. मात्र, काही लाभार्थींना या महिन्यात हप्ता मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा : Kalyan News : दीर-भावजयच्या नात्याला काळिमा; राहत्या घरात… शहरात खळबळ
राज्य सरकारकडून लाभार्थ्यांची छाननी सुरू असून, ज्या महिलांचे कुटुंबीय उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, योजनेसाठी सध्या ₹1500 रुपयांचाच लाभ सुरू राहणार असून, 2100 रुपयांच्या हप्त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचार केला जाईल.
योजनेचा गैरवापर करणाऱ्या महिलांनी स्वत:हून नावं मागे घ्यावी, अन्यथा दंडासहित रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे.
डिसेंबर 2024 पर्यंत 2.47 कोटी महिलांनी योजनेचा लाभ घेतला असून, ज्या महिलांनी वेगवेगळ्या योजनांमधून लाभ घेतला आहे किंवा एकापेक्षा अधिक खाती आहेत, त्यांना योजनेतून वगळण्यात येणार आहे. महिलांनी नियमांचे पालन करून या योजनेचा योग्य प्रकारे लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.