Ladki Bahin Yojna Update : मे महिन्यातील हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंत दहा हप्ताचे पैसे मिळाले आहेत. आता अकरावा हप्ता कधी जमा होईल, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्यातील हप्त्यासाठी 3.37 कोटींच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. आता प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली की हप्त्याची रक्कम तातडीने वितरित केली जाईल. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच अधिकृत माहिती जाहीर करतील.
महिलांना ‘या’ योजनेचाही मिळणार लाभ
लाडकी बहीण योजनेसारखीच ‘इ पिंक रिक्षा’ ही योजना आहे. या योजनेतून महिलांना स्वतः चा रोजगार निर्माण करता येईल, तसेच कामकाजी महिलांना प्रवासात सेफ, सुरक्षित वातावरण तसेच रात्री अप-रात्री महिला या पिंक इ-रिक्षाच्या माध्यमातून सुरक्षित फिरू शकतील, असे या योजनेमागे उद्दिष्ट आहे.
या योजनेत पिंक ई रिक्षाच्या एकूण किमती पैकी 20% अनुदान राज्य सरकार देणार असून दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावी लागणार आहे. तर उर्वरित 70 टक्के रक्कम सवलतीच्या व्याजदरावर कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, अमरावती या आठ जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पिंक ई रिक्षा गरजू महिलांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
