CM Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना अद्याप मिळालेला नाही. अशातच आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. एप्रिल महिन्याचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महायुती सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना २८ जून २०२४ रोजी सुरु केली.
या योजनेमार्फत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५०० असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येत आहे. योजनेच्या पैशातून अनेक लाडक्या बहिणांनी कुटुंबासाठी औषधे खरेदी केले, काही घरात लागणाऱ्या वस्तू देखील खरेदी केल्या आहे. जुलै महिन्यात सुरु झालेल्या या योजनेत आतापर्यंत महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये मिळाले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना अद्याप मिळालेला नाही. अशातच आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. एप्रिल महिन्याचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे.