---Advertisement---
फैजपूर, प्रतिनिधी : गेल्या तीन वर्षांपासून फैजपूर शहरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या सातत्याने भेडसावत आहे. दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र दिसून येत असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शासनाच्या पाणी वाचवा अंतर्गत ‘जल है तो कल है ‘, अश्या प्रबोधन जाहिरातीवर शासनाचा मोठा खर्च केला जातो, मात्र याला अपवाद असलेले हे चित्र फैजपूर शहरातील जल शुद्धीकरण केन्द्र जवळील रोझोदे रस्त्यावरिल व्हाल्व प्रेशर मेंटन्स करण्यासाठी असलेल्या पिलरमधील मोठया लिकेजमुळे पिण्याच्या शुद्ध पाण्याची अनेक दिवसांपासून नासाडी होत आहे.
याचे चलचित्र महामंडलेश्वर श्रीजनार्दनहरी महाराज यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून प्रशासनाबाबत खंत व्यक्त केली. नगरपालिका प्रशासन तात्काळ कारवाई करीत पाण्याचा होणार अपव्यय टाळेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.









