---Advertisement---
Mamurabad Call Center Case : जळगाव येथे बोगस कॉल सेंटर सुरु करण्यासंदर्भात गुन्हा दाखल असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांची जून महिन्यामध्येच संशयितांसोबत बैठक झाल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात मुंबईतून हे केंद्र हाताळणाऱ्या तिघांपैकी इम्रान अकबर खान (रा. मुंबई) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून अटक केले आहे. विविध आमिषे दाखवून इंग्लंडसह अन्य देशांमधील नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जळगावातील बनावट कॉल सेंटरवर जळगाव पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी छापा टाकला होता.
गुन्हा दाखल असलेला अकबर याची ललित कोल्हे यांच्यासोबत जुहू येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ओळख झाली होती. अकबर हा त्यापूर्वीपासूनच आदीलसोबत असे काम करत असल्याने त्याला अशा कॉल सेंटरच्या कामकाजाविषयी माहिती होती.
जळगावात असे कॉल सेंटर सुरू करण्यासाठी अकबर, आदील, इम्रान व राकेश अगारिया यांच्यासोबत ललित कोल्हे यांची जून महिन्यात बैठक झाली. त्यानंतर कोल्हे यांनी आपल्या फार्म हाऊसमध्ये कामे केली.
पूर्वी रॅकेट चालविणारा हाताळायचा जळगावचे केंद्र
जळगावचे केंद्र हाताळणारा अकबर व त्याचा मित्र ऋषी उर्फ केशव राजू बेरिया (रा. मुंबई) हे या पूर्वी अशाच प्रकारचे फसवणुकीचे रॅकेट हाताळत असल्याचीही माहिती समोर आली आहे. या दोघांसह आदील सैयद निसार अहमद सैयद या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. अटक केलेला इम्रान खान हा या पूर्वीच जळगावात येऊन गेला आहे.
---Advertisement---