नवी दिल्ली । भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बुधवारी रात्री राजधानी दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, वाढत्या वयोमानानुसार होणाऱ्या प्रकृतीच्या समस्यांमुळे आडवाणी यांना बुधवारी रात्री एम्समध्ये दाखल करण्यात आले. भारताच सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘भारतरत्न’ने आडवाणी यांना याचवर्षी सन्मानित करण्यात आले होते. सध्या एम्समधील जेरियाट्रिक विभागातील डॉक्टराच्या निरीक्षणाखाली लालकृष्ण आडवाणी यांना ठेवण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना रूटीन चेकअपसाठी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे.सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे.